आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खाणे पिणे आणि अनियमित दिनचर्येमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जास्त केस गळणे, अकाली पांढरे होणे हा चिंतेचा विषय आहे. केसांच्या या समस्येवर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास केस गळण्याची समस्या आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
हे उपाय करा
* मध केसांना लावल्यास केस गळण्याते प्रमाण कमी होते. केस अकाली पांढरे होणे थांबते.
* कांद्याचा रस काढून तो गरम करावा आणि ठंड झाल्यानंतर केसांना लावावा. त्यापूर्वी गरम पाण्याने भिजलेला टॉवेल केसांना काहीवेळ गुंडाळून ठेवा. त्यानंतर कांद्याचा रस केसांवर लावा. काहीवेळाने केसांना शॅम्पूने धुवा. असे नियमितरित्या केल्यास केसाच्या समस्या दुर होतील.
* आंघोळीपूर्वी टोमॅटोची पेस्ट बनवून केसांवर लावली तर केस गळण्याचे प्रमाण आणि कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते.
* आवळ्याच्या चुर्णामध्ये दही मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट हलक्या हाताने केसांवर लावा. काहीवेळाने केस धुवावेत. यामुळे केसांची समस्या दूर होऊ शकते.
* दालचिनी पावडर आणि मध यांचे मिश्रण केसांना लावल्यास केस गळणे बंद होते.
* ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट बनवा. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळणे थांबते.
हे लक्षात ठेवा
* अकाली येणारे पांढरे केस मुळातून उपटू नका. पांढरे केस उपटून काढल्याने त्या ठिकाणी अधिक पांढरे केस येतात. केस मुळापासून उपटण्यापेक्षा कात्रीने कापावेत. हा उपाय केल्यास नक्कीच फायदा मिळेल.
* पोटाच्या समस्येनेसुध्दा केस पांढरे व कमजोर होऊ शकतात. अॅसिडीटी आणि अपचनाचा त्रास असल्यास त्रिफळा चूर्ण नियमित सेवन करावे. यामुळे पोटासंबंधीत समस्या दुर होतात.