आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात पिंपल्सची समस्या जास्त होते. याचे कारण उष्णता आणि घाम आहे. स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी महिला उन्हाळ्यात सनस्क्रीन इत्यादीचा आधार घेतात परंतु तरीही काहीही परिणाम होत नाही. जर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात पिंपल्स, टॅनिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही एक अशी वस्तू सांगणार आहोत जिच्यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो.
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
उन्हाळ्यात पेरू खुप लाभदायक ठरू शकतो. पेरूसह त्याची पाने सुद्धा खुप चांगली मानली जातात. पेरूच्या पानांमध्ये अँटी मायक्रोबियल अॅक्शन असते कारण यामध्ये आयसोफ्लेवोनॉईड्स, गॅलिक अॅसिड, एस्कोर्बिक अॅसिड, कारोटेनॉइड्स सारखी अॅक्टिव्ह इंग्रीडियंट्स असतात, जी स्किन इन्फेक्शन आणि जळजळ इत्यादी ठिक करू शकतात. पेरूच्या पानांचा फेसपॅक कसा तयार करायचा आणि कसा लावावा जाणून घेवूयात…
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
असा तयार करा फेसपॅक
यासाठी सर्वप्रथम पेरूची कोवळी पाने घ्या. ती चांगली स्वच्छ करा. थोडे पाणी घेऊन बारीक पेस्ट तयार करा.
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
असा लावा फेसपॅक
पॅक लावण्यासाठी सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने आणि माइल्ड क्लींजरने धुवून घ्या किंवा चेहर्यावर 5 मिनिटांसाठी स्टीमसुद्धा घेऊ शकता. ज्यामुळे पोर्स खुले होतील. आता ही पेस्ट चेहर्यावर लावा. पेस्ट सूकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ