आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या लोकांमध्ये झोपेच्या समस्या या मानसिक कारणांशी निगडीत असल्याचे एका संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना आढळले. या संशोधनात सरासरी ३१ वर्षांचे १६५ म्हणजेच ५२ टक्के पुरूष सहभागी झाले होते. हे संशोधन स्लीप पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनामध्ये सहभागी सर्व व्यक्ती, २०१०मधील भूकंपाने प्रभावित असणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या पोर्ट-ए-प्रिंस-हॅतीमधील होत्या. यापैकी बहुतोश लोकांच्या मानसिक ताणामुळे झोपेवर परिणाम झाला असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.या अभ्यासानुसार या देशात झालेल्या हा भूकंप आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप होता. यामध्ये जवळपास २ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
१० लाखांपेक्षा जास्त निवासी लोकांचे विस्थापन करावे लागले होते. या संशोधनाबाबत माहिती देताना न्यूयॉर्क यूनिवर्सिटीतील संशोधनाचे प्रमुख लेखक जूडिट ब्लँकने सांगितले की, २०१०मध्ये झालेल्या हैती भूकंपातून बचावलेले लोकांमध्ये असलेल्या झोपेच्या समस्यांबाबत जाणून घेण्यासाठी करण्यात आलेलं हे पहिलं संशोधन आहे. या संशोधनातून या आपत्तीमधून बचावलेल्या लोकांचा समूह आणि मध्ये कोमोरिड झोपचे स्थिती यांमध्ये असलेला संबंध रेखांकित करण्यात आला आहे.संशोधकांनी भूकंपानंतर दोन वर्षांपर्यंत या नैसर्गिक आपत्तीमधून बचावलेल्या लोकांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, संशोधनात सहभागी ९४ टक्के लोकांमध्ये झोपेच्या समस्या होत्या.
दोन वर्षांनंतर ४२ टक्के लोकांमध्ये पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) चा महत्त्वपूर्ण स्तर आढळला. जवळपास २२ टक्के लोकांमध्ये डिप्रेशनची समस्याही आढळली. नैसर्गिक आपत्तीमधून बचावलेले लोक, ज्यांनी जवळची माणसे, संपत्ती, घर-दार सर्व काही गमावले ते घटनेच्या दोन वर्षांनंतरही मानसिक तणावाखाली होते. त्यामुळे त्यांना झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परिणामी, कोणत्याही कारणामुळे आलेला मानसिक तणाव आणि झोप यांचा संबंध असतो, हे यातून सिद्ध झाले. झोप ही आरोग्यासाठी महत्वाची असते. पूर्ण झोप मिळाली नाही किंवा सतत जागरण झाल्यास त्याचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो. अनेक त्रास यामुळे सुरू होतात. शारीरीक समस्यांसह अशा व्यक्तीला मानसिक त्रासांनाही सामोरे जावे लागते. यामुळे पूर्ण झोप मिळण्यासाठी तुमचे मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे, हेच या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणताही तणाव असला की त्याचा परिणाम झोपेवर होत असतो.