आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हाडे कमकुवत झाल्यास अनेक शारीरीक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी शरीराला मोठ्याप्रमाणात कॅल्शियम देणारे अन्नपदार्थ खाणे गरजेचे असते. चीजमधून मोठ्याप्रमाणात कॅल्शियम मिळत असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. यातील चरबीयुक्त घटकामुळे ते खाल्ले जात नाही. पण त्याचे अन्य फायदे भरपूर असल्याने चीज नियमित खाल्ले पाहिजे.
हे आहेत फायदे
१ चीज खाल्याने हाडे बळकट होतात. सांधेदुखी व हाडांच्या अन्य दुखण्याचा त्रास होत नाही.
२ गरोदर महिलांनी आहारात चीजचा समावेश केल्यास सुदृढ बाळ जन्माला येते. बाळ जन्माला येतेवेळी आईला जास्त त्रास होत नाही.
३ चीजमुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो. यात बी जीवनसत्व असल्याने कोणत्याही रोगाची लागण शरीराला होत नाही.
४ वजन नियंत्रित राहते. यासाठी चीजचा एक तुकडा दिवसातून एकदा खावा.
५ चिजमधून शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शियम मिळते. हाडे व दात मजबूत होतात.
Visit : arogyanama.com