आरोग्यनामा टीम- शरीराच्या खालील भाग मजबूत बनवण्यासाठी रिव्हर्स लंग्स एक्सरसाईज खुप लाभदायक आहे. यामुळे लोअर बॉडी पूर्णपणे फिट राहाते. लंग्स एक्सरसाईज गुडघ्यांवर होणारा एक व्यायाम आहे, ज्याची सुरूवात गुडघ्यांपासून होते. ही एक्सरसाइज स्क्वॅटच्या तुलनेत खुप गतिशील आहे, ज्यामध्ये दोन्ही पाय स्थिर राहातात. कारण आपले शरीर नेहमी पुढे झुकलेले असते.
रिव्हर्स लंग्समध्ये आपले पाय मागच्या बाजूला दुमडतात. यासाठी मागचा गुडघा जमीनाला टेकतो आणि समोरचा गुडघा तुमच्या मांडीच्या आणि जमीनीच्या समांतर राहतो. ही लंग्स एक्सरसाईज तुमच्या लोअर बॉडीच्या मांसपेशी मजबूत बनवते. यामध्ये ग्लूट्स, क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंगचा समावेश आहे.
रिव्हर्स लंग्स करण्याची सोपी पद्धत
* हा व्यायाम करण्यासाठी, सर्वप्रथम पायांसह खांद्याच्या रुंदीच्या बरोबरीने पाय पसरवून उभे रहावे.
* आता डावा पाय मागे करून खाली झुका. उजवी टाच जमीनीपासून दूर ठेवा.
* दोन्ही गुडघे 90 डिग्री पर्यंत दुमडा. पाठीचा कणा ताठ ठेवा.
* कंबरेवर हात ठेवून हे सहज करता येईल.
* यानंतर सुरूवातीच्या स्थितीत येण्यासाठी आपल्या डाव्या पायाच्या चौड्याने एक मध्यम धक्का द्या.
* काही वेळ एका पायाने केल्यानंतर दुसर्या पायाने सुद्धा हिच प्रक्रिया पुन्हा करा.
* सुरूवातीला नसा ताणल्या सारख्या वाटतील. परंतु नंतर ठिक वाटेल.