आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)च्या म्हणण्यानुसार, फेलुदा ( feluda test ) चाचणीची अचूकता आरटी-पीसीआर चाचणीच्या बरोबरीची आहे. तथापि, या चाचणीचा निकाल एका तासापेक्षा कमी म्हणजे 45 मिनिटांत येतो. त्याच वेळी, आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल देण्यासाठी अधिक वेळ लागतो. कोरोना चाचणीसाठी आरटी-पीसीआरचे निकाल सर्वात विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. फेलुदा चाचण्यांचे अहवालही लवकरच येतात.
या चाचणीचे नाव फेलुदा कसे ठेवले ?
या चाचणीला फेलुदा असे नाव का देण्यात आले. त्याचे पूर्ण नाव फेलुडा feluda test म्हणजेच एफएनसीएएस 9 एडिटर लिंक्ड युनिफॉर्म डिटेक्शन असे आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि टाटा समूहाच्या तरूण शास्त्रज्ञांच्या पथकाने ही चाचणी विकसित केली आहे. या कसोटीची तयारी करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. देबज्योती चक्रवर्ती आणि सौविक मैत्री यांनी यास नाव दिले आहे.
अहवाल 45 मिनिटांत
सीएसआयआरच्या म्हणण्यानुसार, फेलुदा चाचणीची feluda test अचूकता आरटी-पीसीआर चाचणीच्या बरोबरीची आहे. तथापि, या चाचणीचा निकाल एका तासापेक्षा कमी म्हणजे 45 मिनिटांत येतो. दुसरीकडे, आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल देण्यासाठी अधिक वेळ लागतो.
कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या
फेलुदा चाचणी कशी केली जाते?
फेलुदा ही गर्भधारणा चाचणीसारखी असते. जी कागदाच्या पट्टीवरुन केली जाते. त्यात कागदाची पट्टी असते. विषाणूच्या उपस्थिती असल्यास पट्टी रंग बदलते. किटमध्ये दोन ओळी असतात, एक नियंत्रणासाठी आणि दुसरे निकाल दाखविसाठी. तर आरटी-पीसीआर चाचणीसाठी अवजड उपकरणांची आवश्यकता असते.आरटी-पीसीआर उपकरणे महाग आहेत आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. सीएसआयआर-आयजीआयबीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. देबज्योती चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार, फेलूदा चाचणीसाठी तांत्रिक प्रवीणता आवश्यक नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते.
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
किंमत किती आहे?
फेलुदा चाचणीची किंमत सुमारे 500 रुपये आहे, तर आरटी-पीसीआर चाचणी 100 रुपयांत आहे. परंतु आरटी-पीसीआरसाठी लॅबची गरज असते. फेलुदा चाचणी किट कुठेही सहजपणे नेले जाऊ शकते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या