आरोग्यनामा ऑनलाईन- चेहऱ्याच्या सौंदर्यात अनावश्यक केस अडथळा ठरतात. बर्याच वेळा शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्सच्या पातळीत वाढ झाल्यामुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस हळूहळू येऊ लागतात. हे केस आपल्या चेहर्याचे सौंदर्य घालवतात. कोरोनामध्ये, पार्लरमध्ये जाऊन हे केस काढण्यासाठी आरोग्याशी खेळावे लागते. जर आपल्याला चेहऱ्यावरील केस त्रासदायक वाटत असतील तर आम्ही आपल्याला काही घरगुती उपचारांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे आपण चेहऱ्यावरील केसांपासून मुक्त होऊ शकता.
कोरफड आणि मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावरचे केस काढा
चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी 1/4 चमचा हरभऱ्याचं पीठ, 4 चमचे कोरफड जेल आणि 2 चमचे मोहरीचे तेल घ्या. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे सुकू द्या. स्वच्छ कपड्याने चेहरा पुसा. पाण्याने चेहरा धुवा.
कॉर्न फ्लोर स्क्रब
चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी कॉर्न फ्लोरचे स्क्रब करा. हे स्क्रब तयार करण्यासाठी एक अंडे घ्या आणि त्यामध्ये थोडी साखर आणि कॉर्न पीठ घाला. हे पेस्ट केसांच्या भागावर लावा आणि हाताने हलके मसाज करा. मालिश केल्यानंतर ही पेस्ट काही काळ केस असलेल्या भागावर ठेवा. काही वेळाने ते पुसून टाका. चेहर्याच्या नको असणाऱ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून दोनदा ते वापरा.
मेथी मास्क
मेथी त्वचा आणि केसांसाठी खूप उपयुक्त आहे. मेथी चेहर्यावरील केसांची समस्या दूर करण्यास मदत करते. चेहऱ्यावरचे केस काढून टाकण्यासाठी 2 चमचे मेथीचे दाणे, 2 चमचे हरभऱ्याचे पीठ एकत्र करून घ्या. आता ते एका बाउलमध्ये घ्या आणि त्यात अंडे आणि थोडा मध घाला. आता ही पेस्ट 10-15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. आपण ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावू शकता, यामुळे चेहऱ्यावरील केस निघून जातील.
हरभऱ्याच्या पिठाचा पॅक वापरून चेहऱ्यावरचे केस काढा
हरभरा पीठ आणि हळद फक्त चेहराच सुधारत नाही, तर चेहर्यावर असणारे केसही काढून टाकण्यास मदत करते. हरभऱ्याच्या पिठामध्ये थोडे गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि चेहरा 15 मिनिटांसाठी कोरडा होऊ द्या. नंतर स्क्रब करून चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट लावल्यास चेहऱ्यावरील केस निघून जातात.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.