आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामध्ये फॅट बर्न करणे अवघड आहे. डाएटमध्ये फेरबदल करणे, खूप व्यायाम करणे, असे उपाय वजन कमी करण्यासाठी करावे लागतात. परंतु, काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास फॅट बर्न होऊ शकते. यासाठी घाम खूप जास्त घाम गाळण्याची आणि अवघड डाएट करण्याची गरज भासणार नाही. फॅट बर्न करणारे हे कोणते पदार्थ आहेत, याविषयी माहिती करून घेवूयात.
दही
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स म्हणजे फ्रेंडली बॅक्टेरिया शरीराला जास्त प्रमाणात फॅट अँब्सॉर्ब करण्यापासून थांबवते. हा गुण प्रत्येक प्रकारच्या दह्यामध्ये आढळतो.
चिली पेपर्स
चिली पेपर्समुळे फॅट कमी होते. यातील कॅप्सेसिनमुळे चव तिखट असते. कॅप्सेसिनच्या सेवनाने शरीराचे तापमान वाढते. परिणामी, कॅलरीज लवकर बर्न होतात.
दालचिनी
दालचिनी फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहे. एक चतुर्थांश ते एक चमचापर्यंत जेवणात वापर केल्याने याचा परिणाम जाणवू लागतो.
ग्रीन टी
कॅफिन हार्ट रेट वाढवण्यासोबतच शरीराच्या सिस्टिमला कॅलरीज वेगाने बर्न करण्यासाठी मजबूर करते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स असते. हे तत्त्व बेली फॅट वेगाने बर्न करते.