आरोग्यानामा ऑनलाइन टीम – श्वसननलिका आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका अँटीबायोटिकसंबंधी धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका संशोधनानुसार, मोक्सिसिलिन आणि फ्लोरोक्विनोलोनसारख्या सामान्य अँटीबायोटिकच्या वापरामुळे नाडी म्हणजे रक्तवाहिन्यांना हानी पोहोचण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत वाढतो. वय वाढत जाते, तसा हा धोका वाढत जातो.
रक्तवाहिन्या व्यक्तीचा मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या उर्वरित शरीरासोबत संबंध स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अवयवांकडून मेंदूपर्यंत संदेश पोहोचविण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान असते. ब्रिटिश युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी १३ लाखांपेक्षा जास्त लोकांशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण या अध्ययनात केले. त्यात असे दिसून आले की, एमोक्सिसिलिन आणि फ्लोरोक्विनोलोनसारख्या सामान्य अँटीबायोटिकमुळे पेरिफेरल न्यूरोपॅथीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. पेरीफेरल न्यूरोपॅथी हानीग्रस्त झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे होणारा एक आजार आहे. त्यात हातपाय सुन्न पडतात. शास्त्रज्ञांनी सांगितले की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा धोका जास्त असतो.