रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एका संशोधनानुसार दररोज एक कप कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅटसोबत लढणारी सुरक्षा उत्तेजित होते, यामुळे लठ्ठपणासोबतच मधुमेहाशी लढण्यास मदत मिळते. हे संशोधन साइन्टिफिक रिपोट्र्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ब्राउन फॅट फंक्शन हा शरीराचा भाग वेगाने कॅलरी बर्न करून एनर्जी तयार करतो. कॉफीमधील काही तत्त्व ब्राउन फॅट फंक्शनवर थेट प्रभाव पाडतात. कॉफी तर सर्वांच्याच आवडीची असते. त्यामुळे हा आवडता उपाय करून आता लठ्ठपणा आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल.
शरीरात २ प्रकारचे फॅट असतात. ब्राउन एडिपोज टिशू, यास ब्राउन फॅटही म्हणतात. शरीरात गरमी निर्माण करण्याचे काम हे फॅट करते. यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होतात. शरीराचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स कमी असणारांमध्ये ब्राउन फॅटचे प्रमाण अधिक असते.
ब्राउन फॅट शरीरात गरमी निर्माण करून शुगर व फॅट बर्न करण्यास मदत करते. जेव्हा या ब्राउन फॅटची अॅक्टिव्हिटी वाढवली जाते, तेव्हा शरीरातील ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते. तसेच कॅलरी बर्न होतात, व वजन कमी होते. कॉफीमधील कॅफीन हे तत्व ब्राउन फॅटला उत्तेजित आणि अॅक्टिवेट करण्यास मदत करते. अशात या कॉम्पोनेंटचा वापर वेट लॉस मॅनेजमेंटसोबतच ग्लूकोज रेग्यूलेशन प्रोग्रामसाठीही केला जाऊ शकतो. जेणेकरून लठ्ठपणा कमी करण्यासह मधुमेहही कंट्रोल केला जातो, असे युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगमचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य मायकल सायमंड्स यांनी म्हटले आहे.