डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका

eyes-red

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गंभीर आजार असल्यास डोळे लाल होऊ शकतात. अनेक वेळा डोळे लाल होणे हे गंभीर आहे. तसेच इरिटेशन, जळजळ, पाणी येण्याचा त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. डोळे लाल होण्याच्या समस्येकडे जास्त दिवस दुर्लक्ष केल्यास धोकादायक ठरू शकते.

डोळे लाल होण्याची काही कारणे आहेत. या कारणांची माहिती आपण करून घेवूयात. डोळ्यांच्या मधोमध असलेल्या लहान गोल आकाराला कॉर्निया म्हणतात. यावर एखादी जखम झाल्यास डोळे लाल होऊ शकतात. ग्लूकोमा या आजारात डोळ्यांवरील दाब वाढते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. तसेच डोळ्यांमध्ये कॉर्नियाच्या मागे आयरिस असतो. यामध्ये सूज येण्याला आयरायटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. स्क्लेरायटिस या आजारात डोळ्याच्या पांढ-या भागाची एखादी जागा लाल होऊ शकते. आर्थरायटिस, टीबी सारख्या पेशेंटमध्ये हे संकेत जास्त असतात.

डोळ्यांच्या मागे कॉर्नियाच्या मागे आयरिस असते. यावर सूज येण्याला आयराइटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कंजक्टिवायटिस म्हणजेच डोळे येण्याची समस्या होऊ शकते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात. डस्ट, धुर, पाळीव प्राणी, शाम्पू, स्विमिंग पूलच्या पाण्यातील क्लोरीन इत्यादीच्या अ‍ॅलर्जीमुळे डोळे लाल होतात. स्लीपिंग पिल्स, पेन किलर्स, डिप्रेशन दूर करणारे औषध किंवा अँटी एलर्जिक मेडिसिन्समुळे डोळे लाल होऊ शकतात. मोनोपॉजच्या एजमध्ये पोहोचलेल्या महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्समुळे डोळे डाय आणि रेड होऊ शकतात. तसेच सतत कॉन्टॅक्ट लेन्स लावल्याने आणि काढल्यामुळे इरिटेशन, डायनेससह डोळे लाल होऊ शकतात.