चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –नारळ पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहीतच असेल पण नारळ पाणीचे सेवन अधिक करणे ही  कधी कधी धोक्याचे असते. त्यामुळे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे की नारळ पाणी कधी प्यावे आणि कधी पिऊ नये. नारळ पाण्यात व्हिट्यामिन, कॉल्शियम, फायबर, मँग्नेशियम आणि खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

नारळ मध्ये फॅटचा प्रमाण अगदी कमी असतो आणि कोलेस्ट्रॉलची मात्र पण कमी असते. म्हणूनच हृदयाच्या समस्या असणारे आणि वजन वाढीचा सामना करणाऱ्यांसाठी नारळ पाणी उत्तम उपाय आहे. नारळ पाणी पिल्याने शरीरात कधीच पाण्याची कमतरता भासत नाही. एका नारळामध्ये कमीत कमी २०० ते २५० मिली. लिटर इतका पाणी असतो. परंतु ज्या लोकांना सोडियम आणि पोट्याशिअम संबंधी काही समस्या असेल तर त्यांनी नारळ पाणी जरा सांभाळूनच प्यावे. कारण या नारळ पाणीमुळे त्यांच्या शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते.

वर्कआऊट नंतर जर तुम्ही नारळ पाणी पीत असाल तर ते टाळा. कारण नारळ पाण्यामध्ये  साध्या  पाण्याच्या तुलनेत सोडियमचा प्रमाण जास्त असतो. आणि सोडियमची मात्रा तहान वाढवते. म्हणून वर्कआउट नंतर साधे पाणी पिणेच योग्य.

कोणाला जर जास्त थकवा किंवा कमजोर वाटत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचा सेवन करणे टाळावे. जर त्या व्यक्तीने नारळ पाणी पिले तर त्याच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा संतुलन बिघडतो आणि तो जास्तच कमजोर बनतात.

शरीरासाठी नारळ पाणी चांगले  सांगितले जाते. परंतु याचा अति सेवन धोका धायक असतो. कारण नारळ पाणी मध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. ३००मिली नारळ पाण्यात ६० कॅलरी असते. म्हणून याचे अधिक सेवन करू नये.

नारळ पाणी थंड असल्याने ज्यांना गुडघ्यात दुखणे असेल  तर त्यांनी नारळ पाण्याचा सेवन करू नये. यामुळे त्यांचा गुडघ्यांचा त्रास जास्त होतो.