आरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशातील लोक कोरोनाच्या (Covid-19) दुसर्या लाटेचा सामना करत असताना एक्सपर्ट दुसर्या लाटेनंतर आता कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगत आहेत. अशावेळी तुम्हाला मुलांमध्ये याची लक्षणे ओळखण्याची पद्धत आणि घरात याचा उपचार करू शकता किंवा नाही याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये मुलांमधील कोविड-19 च्या लक्षणांबाबत सांगितले आहे.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे :
1. ताप
2. खोकला
3. श्वास घेण्यास त्रास
4. थकवा
5. घशात खवखव
6. अतिसार
7. रायनोरिया
8. गॅस्ट्रोइंटेस्टायनल
9. वास घेण्याची क्षमता जाणे
रिपोर्टनुसर, मुलांमध्ये नवीन लक्षण मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम दिसून आला आहे. यामध्ये मुलांना सतत ताप येतो आणि त्यांचे तापमान 38 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते.
विना लक्षणांचा कोरोना कसा ओळखाल?
मुलांमध्ये विना लक्षणांच्या कोरोनाचे निदान करण्यासाठी पद्धत ही आहे की, जर घरातील एखादा सदस्य पॉझिटिव्ह आढळला तर मुलांची सुद्धा टेस्ट केली जाऊ शकते. अशावेळी मुलांवर लक्ष ठेवा आणि उपचार सुरू करण्याची आवश्यकता असते.
‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !
जर हलका संसर्ग असेल तर असा करा उपचार
ताप- पॅरासीटामोलचा 10-15 एमजी/केजी प्रत्येक डोस दिवसात 4-6 तासांनी देत रहा.
खोकला – गरम पाण्याने गुळण्या करा
डाएट – हायड्रेशन कमरतेला दूर करणारा आणि पोषकतत्व असलेला आहार सेवन करा. जन्मजात हृदयरोग, फुफ्फुसाचा जुना रोग आणि लठ्ठपणा सारख्या स्थितीत डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केला जाऊ शकतो. आपत्कालीन स्थितीत पालकांनी स्पेशलिस्टकडून ट्रिटमेंटची इतर माहिती घेतली पाहिजे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
मुलांमध्ये कोविड-19 ची लक्षणे कशी ओळखावीत? जाणून घ्या घरी करू शकता का उपाचार?