पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासुन राज्यात सर्वत्रच कोरोनाचा (covid-19) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विदर्भात तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 743 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून गेल्या अनेक दिवसांतील हा खुप मोठा आकडा आहे. पुणे शहरातील कोरोनाचा (covid-19) प्रादुर्भाव वाढत असल्याचे आता समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
दिवसभरात 382 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील एकाचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या 207 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 99 हजार 696 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 91 हजार 300 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 3 हजार 559 सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यातील 4 हजार 837 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री संचार निर्बंध घालण्यात आले आहेत.
नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे.
Home Remedies | मासिकपाळी टाळण्यासाठी औषधे घेऊ नका, ‘हे’ घरगुती उपाय करा; जाणून घ्या
Health News | ऑक्सिजनची पातळी किती असावी? घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची ते जाणून घ्या…
Weight loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘ही’ 8 फळे आणि भाज्या वेगाने कमी करतील वजन; जाणून घ्या