आरोग्यनामा टीम – जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार जगभरात साधारण 40 मिलियनपेक्षा अधिक लोकांना डायबिटीस आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत असताना डायबिटीसच्या रुग्णांसाठी काही महत्त्वाच्या गाइडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाईन्स जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या आहेत. यामध्ये डायबिटीसच्या रुग्णांना कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. एखाद्या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला लवकर संक्रमण होतं आणि त्यांना इतर समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा लोकांनी आपली विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात देखील कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणे सध्या बंद करण्यात आले आहे. मात्र तरी देखील अशी काही ठिकाणे आहेत तिथे अनेक लोक एकत्र येतात. डायबिटीसच्या रुग्णांनी अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण डायबिटीसच्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते. त्यामुळे व्हायरसचे संक्रमण अशा व्यक्तींना सहजपणे होऊ शकते.
लोकांच्या भेटी टाळा
डायबिटीसच्या रुग्णांना कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी लोकांच्या भेटीगाठी घेणं टाळलं पाहिजे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्या व्यक्तीकडून कोरोनाचे संक्रमण होईल ये सांगता येत नाही. त्यातच डायबिटीसच्या रुग्णांना लगेच संक्रमण होत आहे. मुळात डायबिटीसच्या रुग्णांनी कोणतंही संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. अशात ते कोरोना पीडिताच्या संपर्कात आल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
ब्लड शुगर लेव्हल सतत चेक करा
डायबिटीस रुग्णांनी नियमित त्यांची ब्लड शुगर चेक करायला पाहिजे. जेणेकरुन काही समस्या होऊ नये. दरम्यान, आता कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावतही डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे, की डायबिटीसच्या रुग्णांनी वेळोवेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल चेक केली पाहिजे. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे इम्यून सिस्टीम कमजोर होऊ शकते. इम्यून सिस्टीम कमजोर झाली तर त्यांना कोरोनाची लागण सहजपणे होऊ शकते.
ब्लड शुगर चेक करण्याची मशिनची स्वच्छता
ब्लड शुगर चेक करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन रुग्ण स्वत: वापरत असेल किंवा घरातील कुणी सदस्य वापरत असेल तर नियमित ती मशीन स्वच्छ करावी. सॅनिटायजरच्या काही थेंबांनी तुम्ही ही मशीन स्वच्छ करु शकता. याने हा फायदा होईल की, मशीनवर कोणत्याही प्रकारचा व्हायरस राहणार नाही. सॅनिटायजरने मशीन स्वच्छ केली तर संक्रमणाचा धोका कमी होतो.