आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तज्ज्ञांनुसार एक मध्यम आकाराची सिगारेट (Cigarette) ओढल्याने आपल्या आयुष्यातील जवळपास 6 मिनिटे कमी होतात. सिगारेटमध्ये (Cigarette) निकोटिन (nicotine), टार (cigarette tar in lungs), आर्सेनिक (arsenic in tobacco) आणि कॅडमियमसह (cadmium) चार हजार हानिकारक तत्व असतात. याशिवाय वायु प्रदूषण, चूल आणि कंपन्यांच्या चिमण्यांचा धुरसुद्धा आपल्या फुफ्फुसाचे नुकसान करतो.
COPD (chronic inflammatory lung disease) पासून वाचण्यासाठी वायु प्रदुषण कमी करणे आवश्यक आहे. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसर्या बुधवारी जागतिक सीओपीडी दिवस साजरा केला जातो.
लोकांना जाणून घ्यावी सीओपीडीची भिषणता
छाती रोगतज्ज्ञ डॉ. व्ही. एन. अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण सीओपीडी आजार आहे. लोक याच्या बाबत सावध नाहीत. लोकांना याची भीषणता सांगण्याची आवश्यकता आहे. सिगारेटच्या (Cigarette) पाकिटावर यामुळे होणारे दुष्परिणाम मुद्रित केले पाहिजेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. जर सिगारेट (Cigarette) किंवा तंबाखू उत्पादनांवर (tobacco products) याची भीषणता प्रदर्शित केली गेली तर लोक सावध होतील.
सीओपीडीची कारणे आणि लक्षणे
1. धुळ-धूम्रपान, धुळ-गलिच्छ वातावरणात राहणे.
2. श्वास घेण्या त्रास, खोकला-कफ
3. फुफ्फुसे प्रसरण-आकुंचन होण्याची क्षमता कमी होणे.
4. श्वासनलिकेत सूज आणि आखडणे.
5. जीव घाबरणे, श्वास घेतल्यानंतर शिटीसारखा आवाज येणे.
6. छातीत आखडणे.
Web Title :- Cigarette | one cigarette reduces your life by six minutes it contains four thousand harmful elements