आहारात ‘हे’ बदल केल्यास वाढते प्रतिकारशक्ती, कॅन्सरपासून होतो बचाव
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जगभरात कॅन्सरच्या आजाराने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. भारतामध्ये तर कॅन्सर हे मृत्यूचे दुसरे सर्वांत मोठे कारण आहे. अशा या आजाराला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्चच्या अभ्यासानुसार दरवर्षी कॅन्सरचे सात लाख रुग्ण समोर येतात. कॅन्सरपासून वाचण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. यासाठी आपल्या आहारात काही बदल केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
लोवा वुमेन्स हेल्थ स्टडीनुसार ज्या महिला लसूण खातात, त्यांच्यात कोलोन कॅन्सरचा धोका लसूण न खाणाऱ्या महिलांच्या तुलनेत ५० टक्के कमी होत असल्याचे दिसून येते. लसणातील फायटोकेमिकल्स कॅन्सरची शक्यता कमी करते. यामुळे इन्सुलिनची निर्मिती कमी होऊन शरीरात ट्यूमर होऊ देत नाही आणि ब्रेस्ट, कोलोन आणि पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत होते. लसून सलाद किंवा ऑम्लेटमध्ये मिसळून खावे. भाजी किंवा सूपमधूनही घेऊ शकता.
गाजरदेखील या आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. गाजरमधील अल्फा आणि बीटाकॅरोटिन्स कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाही. गाजर गर्भाशय, मूत्राशय, पोट आणि स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित करून हार्टअॅटॅकचा धोका कमी करण्यास मदत होते. गाजर सलादमध्ये टाकून खावे. भाजीत टाकून किंवा याचा रस बनवूनही घेता येते. तसेच कॉफीत असणारे अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशी तयार होऊ न देण्यासाठी मदत करतात.
टोकियो येथे असणारे नॅशनल कॅन्सर सेंटरमधील अभ्यासक्रमामध्ये १०,००० लोकांवर संशोधन केल्यानंतर जवळपास रोज कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचे आढळून आले आहे. कमी साखर असलेली किंवा ब्लॅक कॉफी प्यावी. लिंबू देखील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात उपयोगी आहे. लिंबू टाकून कॉफी प्यायल्यास जास्त फायदा होतो. नुट्रीशन अँड कॅन्सरच्या अभ्यासानुसार यात लायकोपिनचे प्रमाण जास्त असते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यास थांबवते. यामुळे फुप्फुस, प्रोस्टेट आणि पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करते.
जेवणामध्ये टोमॅटो खाल्ल्यास प्रोस्टेट कॅन्सरचा धोका जवळपास १८ टक्के कमी होतो. यामुळे वजन कमी करण्यास तसेच संधिवातापासून वाचण्यास मदत होते. तसेच ब्रोकलीही कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयोगी आहे. ब्रोकलीमध्ये असणारे सल्फोराफेन कॅन्सर पेशींची निर्मिती होऊ देत नाही. यात फायटोकेमिकल्स असते, जे शरीरातील टॉक्सिन्स दूर करते. यामुळे स्तन, यकृत, फुप्फुसे, प्रोस्टेट, त्वचा आणि मूत्राशयाच्या कर्करोगापासून बचावण्यास फायदेशीर आहे.