मुलांचे जेवण थंड करण्यासाठी चुकूनही फुंकर घालू नका
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुलांना भरवताना जेवण थंड करण्यासाठी अनेकजण तोंडाने फुंकर घालतात. मात्र, हे अतिशय चूकीचे आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. दातांवर अथवा तोंडात वाढणारे बॅक्टेरिया फुंकर घातल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या वक्तीकडे संसर्ग होऊ शकतो. दातांमध्ये कॅविटी असल्यास फूंकर घालून मुलांचे जेवण थंड केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या तोंडातील बॅक्टेरिया मुलांच्या खाण्यामध्ये जातात.
अशाप्रकारे मुलांच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया गेल्याने त्यांच्या तोंडामध्ये प्लाक तयार होऊन दात येण्याआधीच त्यांच्या तोंडामध्ये कॅविटी तयार होतात. दात आल्यानंतर ५ ते ६ महिन्यांमध्येच मुलांचे दात किडण्यास सुरुवात होते. मुलांच्या खाण्यावर फुंकर घातल्याने, एकाच चमच्याने जेवल्याने असे बॅक्टेरिया पालकांच्या सलाइवा मधून मुलांच्या तोंडात पोहोचतात. म्हणूनच मुलांचे जेवण थंड करण्यासाठी तोंडाने फुंकर मारू नये. ज्या चमच्याने आपण जेवतो किंवा ज्या ग्लासातून पाणी पितो त्याचा वापर मुलांसाठी करू नये. मुलांचे तोडं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. जेणेकरून जास्त बॅक्टेरिया तयार होणार नाहीत. प्रत्येक वेळी जेवल्याने दूध प्यायल्यानंतर मुलांची जीभ, दात आणि गाल स्वच्छ करावेत.