आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुतीचे झाड सर्वत्र आढळते. तुतीच्या फळामध्ये लोह, पोटॅशियम , व्हिटॅमिन के, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखे पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जाणून घ्या तुतीच्या फळाचे आरोग्यासाठी असणारे फायदे –
1) पचन सुधारते
तुतीच्या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या पचनक्रिया सुधारते. तसेच पोटाच्या समस्या दूर करतात.
2) कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव
तुतीच्या फळामध्ये सेंद्रिय संयुगे असतात. जे कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असतात.
3) अशक्तपणा / रक्ताची कमी दूर होते
तुतीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लोहामुळे रक्ताच्या निर्मितीस गती मिळते व शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.
4) डोळ्याच्या समस्यांपासून मुक्त होते
तुतीमध्ये व्हिटॅमिन ए असते. जो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. हे डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू आणि रेटिना इजा इत्यादींपासून देखील संरक्षण देते.
5) रोग प्रतिकारशक्ती वाढते
तुतीचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर बरीच खनिजे असतात जे रोग प्रतिकारशक्ती प्रणालीला चालना देतात.
6) हाडांसाठी फायदेशीर
तुतीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो.
7) त्वचा सुंदर ठेवते
तुतीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-एजिंगचे गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त आणि सुंदर राहते. तसेच नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होतात.