आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक लोकांना सारखा चहा पिण्याची सवय असते. मात्र अधिक चहा घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. चहा घेताना बदल म्हणून गवती चहा हा योग्य पर्याय ठरू शकेल. कारण गवती चहा हा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घ्या गवती चहा कोणत्या आजारणावर आहे गुणकारी –
सर्दी-पडसे –
गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात असते. सर्दी-पडसे असेल तर गवती चहा प्यावा. ताप आला असेल तर गवती चहाची भरपूर पाने घालून चहा प्यावा. याने खूप घाम येऊन ताप उतरतो.
संधिवात-
गवती चहापासून तेलही काढतात. संधिवात असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते.
कॉलरा-
गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.
वजन कमी करण्यास –
गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम जाऊन चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
चमदार त्वचा –
गवती चहातील काही अँटीबॅक्टेरीयल घटकांमुळे बॅक्टेरियाचा नाश होऊन शरीरातील घाण बाहेर निघण्यास मदत होते.त्यामुळे साहजिकच चेहऱ्याचा पोत सुधारून चेहऱ्यावर ग्लो येऊ लागते. तसेच यात ‘अ जीवनसत्त्व’ भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेसाठी ते फायदेशीर आहे.
चहाव्यतिरिक्त गवती चहाचा काढाही बनवता येतो. सर्दी झाली असेल तर गवती चहाचा काढा अवश्य घ्यावा.
काढा बनवण्याची पद्धती –
i ) ४-५ कप पाण्यात तुळशीची पानं, गवती चहा, किसलेलं आलं, धन्याची जाडसर पूड, २-३ काळी मिरी, बेलाची पानं आणि खडीसाखर घ्या. त्याचा उकळून २ कप काढा बनवावा. काढा गाळून घ्यावा, हा गरमागरम काढा रात्री झोपताना घ्यावा.
ii ) सर्दी झाली असेल तर गवती चहात पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा तयार करा. हा काढा रोज रात्री एक कप् प्यावा व उबदार पांघरून घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी-पडसे कमी होते.