आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रोज तेल लावल्यामुळे केस मजबूत होतात. शिवाय केसांची चांगली वाढ होऊन ते पांढरे होत नाहीत. केसांना तेल असल्यामुळे डोक्यावर धूळ चिकटते. यामुळे रोज केस धुवावेत. केसांना रोज तेल लावण्याने कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
मुलायम, चमकदार
तेलाने मसाज केल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात. डोक्यामध्ये रक्त पोहोचते.
प्रोटीन
तेल लावल्यामुळे केसांना प्रोटीन मिळते. केस मजबूत होतात. बदाम तेल, आवळ्याचे तेल लावल्यामुळे केस वाढतात.
वाढ
केस लांब हवे असतील तर नियमित केसांना तेल लावावे. यामुळे केस लांब आणि मजबूत होतात.
पांढरे केस
नियमित तेल लावल्यामुळे केस पांढरे होत नाही. रोज रात्री १० मिनिटे डोक्याला तेल लावून मसाज करा.