आरोग्यनामा टीम – तुम्ही रोज केळी खात असाल तर शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. एका केळीत व्हिटॅमिन बी 6 पैकी 20 टक्के आणि एकूण व्हिटॅमिन सी पैकी 15 टक्के हिस्सा असतो. याचा शरीरात इंसुलिन, हिमोग्लोबिन आणि अमिनो अॅसिड तयार करण्यासाठी फायदा होतो. तुम्ही रोज फक्त 2 केळी खात असाल तर शरीराला किती आणि काय फायदा मिळतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
1) ब्लड प्रेशर – केळीत जवळपास 420 मिलीग्राम पोटॅशियम असतं. याचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप फायदा होतो. याशिवाय यामुळं रक्तवाहिन्यांचं आरोग्यही चांगलं असतं. रोज दोन केळी खाल्ली तर खूप फायदा होतो.
2) एनर्जी – केळीत असणाऱ्या पोटॅशियममुळं स्नायू मजबूत होतात. यातील कार्बोहायड्रेटमुळं शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
3) तणाव – केळीत असणारं ट्रिप्टोफॅन शरीराला सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी मदत करतं. एका केळीत जवळपास 27 मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं. ही पोषकतत्व तणाव दूर करून मूड चांगला ठेवतात आणि झोपही चांगली लागते.
4) पचनक्रिया – केळी पचण्यासाठी हलकी असतात. यामुळं गॅस्ट्रो-इंस्टेस्टायनल ट्रॅकला त्रास होत नाही. यातील प्रतिरोदी स्टार्च पचत नाही. तर तो मोठ्या आतड्यांमध्ये समाप्त होतो. हा शरीरासाठी चांगल्या बॅक्टेरियाच्या रूपात काम करतो.
5) वजन – केळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामुळं बराच वेळ भूक लागत नाही. यातील स्टार्चमुळं भूक कमी होते. यामुळं वजन वाढत नाही. तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाणही कमी होतं.
6) अनिमिया – केळीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. यामुळं रेड ब्लड सेलची निर्मिती करण्यास उत्तेजना मिळते. यातील व्हिटॅमिन बी 6 मुळं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. अनिमियाची लक्षणं दूर करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.