• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ऑफबिट सौंदर्य

चेहरा स्वच्छ करताना घ्या ‘ही’ काळजी

by Nagesh Suryawanshi
May 26, 2019
in सौंदर्य
0
Face
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन – चेहरा सतत धुतल्यानंतर त्वचा चांगली राहते असा अनेकांचा समज आहे. मात्र वारंवार चेहरा धुणे हे चांगले नाही. कामासाठी बाहेर जाताना आणि कामावरून आल्यानंतर चेहरा धुतल्यास हरकत नाही. दिवसातून ४ वेळा चेहरा धुणे ठिक असले तरी त्यापेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नये. उन्हाळ्यात घाम आणि उन्हाने चेहरा तेलकट होत असल्याने तो स्वच्छ ठेवावा. बाहेरून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील धूळ आणि तेल दूर करण्यासाठी चेहरा धुवावा. चेहरा धुताना काय काळजी घेतली पाहिजे.

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तो घासू नये. यामुळे इरिटेशन आणि रेडनसचा त्रास होऊ शकतो. कोरड्या कपड्याने चेहऱ्यावरील पाणी अलगद टीपून घ्यावे. चेहरा पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेल वापरावा. वापरलेल्या टॉवेलवर बॅक्टेरिया असू शकतात. तसेच चेहरा पुसण्यासाठी बेबी टॉवेल वापरावा. कारण यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही. चेहरा धुण्यासाठी त्वचेला योग्य असे क्लिनझर वापरावे. त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर हायड्रेटिंग आणि क्रिमी क्लिनझर वापरावे. त्वचा संवेदनशील असेल तर जेंटल क्लिनझर वापरावे. साबण वापरणे टाळावे. त्वचा ऑईली असल्यास सॅलिसिलिक असिडयुक्त फेसिअल वॉश वापरावा. कॉम्बिनेशन स्किन असेल तर फोमिंग किंवा जेल क्लिनझर वापरावे. क्लिनझर वापरण्याचीदेखील एक पद्धत असते.

तुम्ही क्लिनझिंग लोशन वापरत असाल तर मॉईश्चरायझरप्रमाणे ड्राय स्किनवर काही मिनिटे चोळावे. जेल किंवा फोम्स वापरत असाल तर सुरुवातीला चेहरा ओला करून मग वापरावे. अक्नेसाठी क्लिनझर वापरत असल्यास काही वेळ चेहऱ्यावर क्लिनझर तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर धुवावे. चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे चेहऱ्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लासर आणि कोरडा होतो. यासाठी नेहमी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छा करावा.

Tags: arogyanamafacehealthSkinSummerआरोग्यआरोग्यनामाउन्हाळाचेहरात्वचा
Previous Post

थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी करा ‘योगा’

Next Post

रुग्णांसाठी वरदान ठरतेय ‘ही’ गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Next Post
रुग्णांसाठी वरदान ठरतेय ‘ही’ गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

रुग्णांसाठी वरदान ठरतेय 'ही' गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

pregnancy
माझं आराेग्य

5 शीर्ष गर्भधारणेचे उपाय जे तुम्हाला आकारात परत येण्यासाठी मदत करतील; 5 Pregnancy Remedies to get back in shape

by omkar
February 25, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन -आपण आई बनल्यानंतरचे आयुष्य कधीच एकसारखे नसते - आपल्या प्राधान्यक्रमांपासून आपल्या दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टची क्रांती होते. जिथे तुम्हाला...

Read more
viral infections

बदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ! ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित

February 25, 2021
Hritik Roshan transformation

हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: ‘वॉर’ चित्रपटातील कबीर कसा फिट राहतो ते येथे पहा

February 25, 2021
winter

हिवाळयात ‘हे’ सूप बनवेल तुमची इम्यूनिटी आणखीन मजबूत, आजारपण देखील राहील दूर, जाणून घ्या

February 25, 2021
acidity

अ‍ॅसिडीटीच्या समस्येमुळे तुम्ही खुपच असाल परेशान तर ‘हे’ घरगुती उपाय करा, खुपच कामाला येतील, जाणून घ्या

February 25, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.