दम्याने त्रस्त असाल तर “घ्या” ही काळजी
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्याचा वाढत्या प्रदूषणामुळे आणि वाढत जाणाऱ्या पोटांच्या विकारामुळे अनेकांना दम्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत. पाहिलं तर हा आजार अनेक वेळा जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे या आजाराची योग्य त्यावेळी योग्य काळजी घ्यायला हवी. तरच तो आजार नियंत्रणात राहतो. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पथ्य पाळावी लागतात.
दमा उध्दभवन्याची कारणे खालीलप्रमाणे
१) दूर, धूळ, सिगारेट आणि हवेचे प्रदूषण हे दम्याचे मुख्य कारण आहे.
२)जास्त प्रमाणात थंड पदार्थ खाल्याने दम्याचा त्रास उदभवतो.
3) सतत होणारी सर्दी, खोकला यामुळेही हा आजार उत्पन्न होतो.
४) जास्त मानसिक तणाव, जागरण, अतिश्रम, करणाऱ्यांना दमा होतो.
५) रक्ताची कमतरता, टीबी, हृदयरोग हे आजार ज्यांना आहेत. त्यांना हा रोग होतो.
6) आपल्या घरात जर कोणाला दमा असेल तर आनुवंशिकतेमुळे तो आपल्यालाही होतो.
या आजारावर उपाय काय आहेत
या आजारात दम्याचा अॅटॅक आल्यावर रुग्णास काही इमर्जन्सी औषधी घ्यावी लागतात. तर कधी रुग्णालयात भरती होण्याची पाळी येते. तसेच छातीत खूप कफ भरलेला असेल तर वमन केल्याने कफ बाहेर पडतो. त्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत नाही. दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ सहज सुटतो. तसेच खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा अॅटॅक कमी होतो.
मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकल्यास कफ पातळ होऊन सुटतो. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी 3 चमचे एरंडीचे तेल पिल्यास कफ बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णास आराम मिळतो. हृदयरोग नसणा-या रुग्णांनी एक ग्लास गरम पाण्यात 5 ग्रॅम मीठ टाकून ते पाणी 1-1 चमचा या प्रमाणात दिवसभर पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो.