आरोग्यनामा ऑनलाइन टीम: अपोलो हॉस्पिटल आणि अबोट या दोन्ही संघटना मिळून भारतातील पहिली कार्डिअॅक रजिस्ट्री तयार करत आहेत. कार्डिअॅक रजिस्ट्रीद्वारे भारतात हृदयाच्या आजारांबाबत प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारतातील २५ ते ६९ वयोगटातील २५ टक्के लोकांच्या मृत्यू हा हृदयाच्या आजारांनी होतो. युरोपियन्सच्या तुलनेत भारतीयांना १० वर्ष आधीच हृदयाचे आजार बळावतात. म्हणूनच भारतात हृदयाच्या आजारांबाबत प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये सुधारणा करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल आणि अबोटने हा पुढाकार घेतला आहे.
या दोन्ही संघटना देशभरातील अपोलो रुग्णालयातील रुग्णांच्या हृदयाची माहिती जमा करणार आहेत. याशिवाय अबोट्सच्या ट्रोपोनिन-१ ब्लड टेस्टद्वारे ट्रोपोनिनची पातळी मोजण्यात येणार आहे. कार्डिअॅक रजिस्ट्रीमध्ये जमा केलेल्या माहितीमुळे संशोधकांना हृदयाच्या आजाराचा भारतीयांवर कसा परिणाम होतो हे समजणार आहे. हृदयाला धोका कशामुळे आहे, हृदयाच्या आजारांना कसा प्रतिबंध करता येईल, फिजिशिअन, रुग्ण यांना परिस्थिती आणखी योग्यरित्या हाताळता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कार्डिअॅक रजिस्ट्रीमुळे यूएसमधील हॉस्पिटल आणि फिजिशिअन्स रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा पुरवू शकतात. या प्रमाणे भारतात कार्डिअॅक रजिस्ट्रीमुळे फिजिशिअन्सना जीव वाचवण्यात मदत होऊ शकते.
रुग्णालयातील कामगारांना हृदयाच्या आजाराचा धोका अधिक चांगला समजण्यासाठी गेल्या वर्षी हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात कार्डिअक रजिस्ट्री प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली. अपोलो रुग्णालयाच्या १६,००० पेक्षा जास्त कामगारांची चाचणी झाली आणि त्यांच्या माहितीची रजिस्ट्रीमध्ये नोंद करण्यात आली होती. या उपक्रमात ज्यांचे हृदयाच्या आजाराच्या धोक्याबाबत मूल्यांकन झाले नव्हते, अशा ४५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचा सहभाग होता.