पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्या कोणताही सण, समारंभ असेल तर सर्वात महत्वाचं असत त्याच सेलिब्रेशन आपण आनंद व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. परंतु आपण आनंद व्यक्त करण्यासाठी जे मद्यप्राशन करतो. त्यामुळे थोड्या वेळाची आपली हौस होते. पण हे दारूचं व्यसन आपल्याला कायमच जडलं जात. याकडे प्रत्येकाने लक्ष दयायला हवं. कारण जगभरात ६ टक्के मृत्यू हे दारूमुळे होत असल्याचे रक्त अहवालात समोर आलं आहे. त्यामुळं कशाचंही सेलिब्रेशन करताना आपण आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट याच गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.
* जास्त दारू पिल्याने होणारे वाईट परिणाम *
१) जास्त दारू पिल्याने यकृत, घसा, स्तन आणि तोंडाचा कॅन्सर होतो. त्यामुळे आपलं आरोग्य जपण्यासाठी आपण दारू पासून दूर राहणे आवश्यक आहे.
२) सध्या दारू पिण्याचे प्रमाण महिलांमध्येही खूप वाढले आहे. पण दारूच्या अतिसेवनाने महिलांना पाळीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते.
३) दारूच्या अतिसेवनाने उच्च रक्तदाब किंवा हृदयासंबधीचे आजार होऊ शकतात.
४) महिलांनी गर्भधारणेच्या वेळी जर मद्यपान केले. तर गर्भपात होण्याची दाट शक्यता असते.
५) दारूमुळे पोटाचा अल्सर, जठराला सूज येणे अशा समस्या निर्माण होतात.