आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन मागील काही वर्षांपासून तिच्या चाहत्यांना चित्रपटांतून दिसत नव्हती. यामागचे कारण ही अनेकजण शोधत होते. मात्र, तिने यामागील कारण आता स्व:ता सांगितले आहे. कार्टिसोल हार्मोन्सच्या कमतरतेच्या आजाराने सुष्मिताला ग्रासले होते. या आजारामुळे तिला चित्रपटांमध्ये काम करणेही अवघड होऊन बसले होते. तसेच डॉक्टरांनी सुद्धा तिला विश्रांतीचा सल्ला दिल्याने ती बॉलिवूडपासून काही दिवस दूर होती. सुष्मिताला झालेला हा आजार नक्की काय आहे, याविषयी आपण माहिती घेवूयात.कार्टिसोल एक स्टेरॉइड असून तणावाला हेच हार्मोन कारणीभूत ठरतात. कार्टिसोल हार्मोन्स अधिवृक्क ग्रंथींच्या माध्यमातून रिलीज होता. या ग्रंथी किडनीजवळ असतात. या हार्मोनला स्टड्ढेस हार्मोनही म्हणतात. शरीरात कार्टिसोल हार्मोनचे प्रमाण २४ तासात कमी आणि जास्त होते. कार्टिसोल हार्मोन एटिड्ढनल ग्लँड तयार करतात.
सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये तिला झालेल्या कार्टिसोल हार्मोन्सच्या आजाराबाबत माहिती दिली. तिने या आजाराला कसे तोंड दिले, तिला कोणता त्रास होत होता. तसेच तिने कुठे व कसे उपचार घेतले याविषयी सुष्मिताने या मुलाखतीमध्ये सविस्तर सांगितले. सुष्मिता म्हणाली, २०१४ मध्ये तब्येत खूपच बिघडली होती. ज्यामुळे डॉक्टरांनी काम न करण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान आरोग्यासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २०१४ मध्ये बंगाली सिनेमा निरबाकची शुटींग करताना अचानक बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्यानंतर शरीरात कार्टिसोल हार्मोनची कमतरता असल्याचे सांगितले. एड्रील ग्लँडने कार्टिसोल हार्मोन तयार करणे बंद केले होते. कार्टिसोल हार्मोन तयार न झाल्यास शरीराची विविध अंग हळूहळू काम करणे बंद करतात. या हार्मोन्सची शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका असते. कार्टिसोलचे कमी आणि जास्त प्रमाण असणे दोन्हीही घातक आहे. जास्त काळासाठी शरीरात कार्टिसोलचे जास्त प्रमाण होणे किंवा कमी होणे धोकादायक ठरू शकते.
मी या आजाराच्या फार गंभीर स्थितीत पोहोचली होती. पण हार मानली नाही. डॉक्टरांनी सांगितले की, जर जिवंत रहायचे असेल तर दर ८ तासांनी एक खास स्टेरॉइड घ्यावे लागेल. यास हायड्रोकॉर्टिजोन म्हणतात. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार सुरू केले. पण त्यानंतर २ वर्ष खूपच तणावपूर्ण आणि त्रासदायक होते. वजन वाढत होते. हाडे कमजोर होऊ लागली होती. ब्लड प्रेशरही फार वाढले होते. मी फार जास्त आजारी होते. मी दोन मुलींची आई आहे. माझ्या मुलींना माझी गरज होती. पण मला जे काही होत होते त्यामुळे मी घाबरले होते.
दरम्यान २०१४ ते १०१६ या कालावधीत सुष्मितावर लंडन आणि जर्मनीमध्ये उपचार करण्यात आले. तिची सायनॅक्टेन टेस्ट केल्यानंतर जिवंत राहण्यासाठी सतत स्टेरॉइड्स घ्यावे लागतील, असे सांगण्यात आले.
२०१६ च्या शेवटी सुष्मिता फार जास्त आजारी होती. अशात ती अबूधाबीच्या क्वीकलँड हॉस्पिटलमध्ये गेली. अबूधाबीच्या हॉस्पिटलमध्ये तिला स्टेरॉइड्स देण्यात आले आणि पुन्हा टेस्ट केल्या. जेव्हा ती हॉस्पिटलमधून परत येत होती, तेव्हा अचानक डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, आता स्टेरॉइड्स घेणे बंद केले पाहिजे. कारण शरीर आता पुन्हा कार्टिसोल हार्मोन तयार करू लागले आहे. अशा पद्धतीने अखेर सुष्मिताचा आजार बरा झाला. आता ती पुन्हा ती पडद्यावर दिसू शकते.