पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा फिक्स नसतात. त्यामुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटी झाली की गॅस बाहेर येण्यासाठी आपण इनो घेतो. इनोने ऍसिडिटी बरी होते. पण थोड्या वेळासाठी. परंतु, कोणत्याही आजारांवर तात्पुरता उपाय काय उपयोगाचा नसतो. त्यासाठी कायमचा उपाय शोधणे गरजेचे असते. आणि महत्वाचं म्हणजे तो आजार बरा होण्यासाठी काही पथ्ये पाळणं महत्वाच आहे.
* ऍसिडिटीची लक्षणे खालीलप्रमाणे *
पित्त झाल्याने मळमळ होते. कधीकधी उलट्याही होतात. आणि छातीत जळजळ, डोकं दुखत तसेच डोळ्यांची जळजळ होते. तोंड कडू पडत त्यामुळे ऍसिडिटी हा साधा आजार वाटत असला तरी तो तितका साधा नाही. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय केलेलं चांगले असतात.
* ऍसिडिटीवर घरगुती उपाय *
१) सकाळी उठल्यानंतर २ ग्लास कोमट पाणी पिले तर ऍसिडीटी कमी होते.
२) जेवण केल्यानंतर लवंग चघळा यामुळेही आराम मिळतो.
३) ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
४) रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
५) मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने पित्त कमी होते.
६) जेवल्यानंतर बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळयावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही पित्त कमी होते.