आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. केवळ आतून नव्हे तर बाहेरून सुद्धा शरीरची स्वच्छता ठेवली तरच आरोग्य चांगले राहते. धावपळीच जीवनशैलीमुळे अनेकजण बाह्य स्वच्छतेकडे फार गांभीर्याने पहात नाहीत. स्वच्छतेची सर्व कामे खूप घाईघाईत उरकली जातात. यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. दातांच्या स्वच्छतेबाबतही असेच होत असते. यामुळे बॅक्टेरिया, कॅविटी आणि हिरड्यांमध्ये सूज येण्याची समस्या होते. योग्य वेळी या चुका सुधारणे खुप आवश्यक असते.
या चूका कधीही करू नका
गुळणी न करणे
गोड खाल्ल्यानंतर गुळणी न केल्याने दातांना किड लागण्याची शक्यता असते.
पाणी कमी पिणे
दिर्घकाळ पाणी न प्यायल्याने तोंडातील बॅक्टेरिया वाढतात. यामळे दातांमध्ये कॅव्हिटी होते.
मजबूत गोष्टी तोडणे
बॉटलचे झाकणे दातांनी उघडणे, अक्रोडसारखे पदार्थ फोडणे, यामुळे दात कमजोर होतात. यामुळे दात अवेळी पडतात.
जेवणानंतर ब्रश करा
जेवणानंतर लगेख ब्रश केल्याने दातांच्या वारील थर निघून जातो. यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका वाढतो.
ब्रशनंतर लगेच नाष्टा
ब्रश केल्यानंतर दातांवरचा इनॅमलचा थर निघून जातो. हे ब्रश केल्यानंतर ६० मिनिटांनंतर पुन्हा येते. या काळात काही खाल्ल्याने दातांचे नुकसान होते.
जिभ स्वच्छ करणे
ब्रश करताना जीभ साफ न केल्याने जीभेवरील सर्व बॅक्टेरिया तोंडात पसरतात. याचा दातांवर वाईट परिणाम होतो.
चूकीच्या पद्धतीने ब्रश करणे
ब्रेश करताना वर-खाली, मागे-पुढे अशापद्धतीने केल्यास दात स्वच्छ होतात.