आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीचा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. पोटावरील चरबी वाढणे ही समस्या तर वयाची तीशी ओलांडल्यानंतर बहुतांश जणांना जाणवते. यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. मात्र, व्यायामासाठी पुरेसा वेळ नसल्याने लठ्ठपणा वाढत जातो. यासाठी कमी वेळात करता येणारा व्यायाम केला जाऊ शकतो. काही व्यायाम प्रकार असे आहेत की ते केवळ दहा मिनिटे जरी केले तरी तुमचे वजन जलदगतीने कमी होऊ शकते. सकाळी थोडा वेळ वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगनंतर हे तीन व्यायाम प्रकार करता येऊ शकतात. प्रत्येक कृती जवळपास २० सेकंदांची असते. हे व्यायाम प्रकार कोणते आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत.
१ सिट अप्स
पाठीवर झोपा. गुडघे वाकवा. हात डोक्याच्या मागे ठेवा. उठताना डोक्याने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
फायदे
पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात. कमरेची चरबी जलदगतीने कमी होते. पाठीची हाडे मजबूत होतात.
२ स्क्वॉट जम्पिंग
उभे रहा. पायांमध्ये दोन फुटांचे अंतर ठेवा. पायांवर बसून उडी मारा. ही क्रिया वेगाने करा.
फायदा
यामुळे पोट, पाय, मांड्या, गुडघ्याखालील भागाचे मसल्स मजबूत होतात. शरीरातील चरबी कमी होते.
३ बर्पीज
सरळ उभे रहा. कमरेत आणि गुडघ्यात खाली वाकून हात जमीनीवर ठेवा. पाय मागे घ्या. पुन्हा वाहून बसा आणि पंजावर उभे राहून उडी मारा.
फायदा
पोटावरची चरबी लवकर कमी होते. मांड्या आणि पायांसह सर्व शरीराचा व्यायाम होतो.