आरोग्यनामा ऑनलाईन- बाळाचे दात(teeth) येण्यापूर्वी त्यांच्या हिरड्या मजबूत राहणं गरजेचं आहे. कारण लहान बाळांना दात येताना त्यांना अनेकदा त्रास होतो. हिरड्यांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बाळाचे दुधाचे दात(teeth) हिरड्यांमधून बाहेर येण्याची प्रक्रिया ही 6 महिन्यांनंतर सुरू होते. सुरुवातीला सुळे दात (2), दाढा (2) आणि 4 दात येतात. यानंतर प्रत्येक सहा महिन्याला 4 दात येतात.
दुधाचे दात हे फक्त खाण्यासाठी आणि चावण्यासाठी नव्हे तर बोलण्यासाठी आणि शब्द उच्चारण्यासाठी मदत करतात. बाळाला दात येताना आणि दात आल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
1) दूध पाजल्यानंतर बाळाच्या हिरड्या स्वच्छ पाण्यानं पुसून घ्याव्यात.
2) लहान मुलांना दोन वेळा दात घासण्याची सवय लावावी.
3) वेळोवेळी दंतचिकिस्तकांची भेट घेत मुलांच्या दातांची तपासणी करावी.
4) रात्रभर मुलांच्या तोंडात दुधाची बाटली ठेवू नये. त्यामुळं हिरड्यांचं नुकसान होतं. दुधाचे दात आल्यानंतरही असं करणं टाळावं. कारण दातांचं नुकसान होण्याची शक्यता असते.
5) जेव्हा बाळ दुधाव्यतिरीक्त आहार घेण्यास सुरुवात करतं त्यावेळी त्याच्या हिरड्यांची तसंच दातांची विशेष काळजी घ्यावी.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.