• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ऑफबिट सौंदर्य

डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवायचीत ? जाणून घ्या ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय

by Sajada
January 13, 2021
in सौंदर्य
0
dark circles

dark circles

667
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- कायमच डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, अॅलर्जी, डोळ्यांखालची त्वचा निस्तेज होणं, वयोमान, डिहायड्रेशन, अनुवांशिकता आणि कधी कधी पिगमेंटेशनमुळं डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. अनेकजण यावर विविध उत्पादनं वापरून पाहतात. परंतु त्यानं काहीही फरक पडत नाही. जर तुम्हीही या समस्येनं ग्रस्त असाल तर आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) टोमॅटो – एक लहान लिंबांचा रस आणि एका लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करून ते मिश्रण डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटे हे मिश्रण डोळ्यांखाली ठेवून त्यानंतर पाण्यानं धुवून घ्या. दिवसातून साधारण दोन वेळा हा प्रयोग केला तर फायदा होतो. त्याचसोबत टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस पिल्यानंही काळी वर्तुळं कमी होतात.

2) बटाटा – डोळ्यांखालील काळी वर्तुळं लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्यानं डोळ्यांवर लावावा. कापूस त्या रसात भिजवून डोळ्यांवर ठेवावा. 10 मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.

3) टी बॅग – डोळ्यांखालील वर्तुळं कमी करण्यासाठी थंड टी बॅग हा एक उत्तम उपाय आहे. टी बॅग पाण्यात भिजवून थोडा वेळा फ्रीजमध्ये गार करण्यासाठी ठेवा. नंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्यात. या उपायानं तुम्हाला चेहऱ्यात बराच फरक झालेला दिसेल.

4) बदाम तेल – बदाम तेल हे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उत्तम काम करतं. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळं झोपताना डोळ्यांखाली बदाम तेल लावून मालिश केली तर काळी वर्तुळं दूर होण्यास मदत होते.

5) संत्र्याचा रस – संत्र्याचा रस हा डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे. हा रस डोळ्यांखाली लावल्यास अगदी कमी वेळात अतिशय चांगला झालेला उपयोग दिसतो. केवळ काळी वर्तुळं कमी करण्यासाठीच नाही तर डोळ्यांची चमक वाढवण्यासठीही याचा उपयोग होतो.

6) गुलाब पाणी – गुलाब पाण्यामुळं त्वचा चमकदार होते. त्वचेत जिवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा 15 मिनिटांसाठी कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: dark circleshome remediesकाळी वर्तुळघरगुती उपाय
ginger
Food

आल्याचे पाणी प्यायल्यास होणारे फायदे माहित आहेत का?

May 27, 2019
उंची न वाढण्‍याची ‘ही’ आहेत ८ कारणे, ‘या’ ५ उपायांनी दूर होऊ शकते ही समस्‍या
फिटनेस गुरु

उंची न वाढण्‍याची ‘ही’ आहेत ८ कारणे, ‘या’ ५ उपायांनी दूर होऊ शकते ही समस्‍या

August 24, 2019
Cholesterol
माझं आराेग्य

कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास वाढतो हॅमरेजिक स्ट्रोकचा धोका ! जाणून घ्या कसं करावं कंट्रोल

August 8, 2020
कोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात ? जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय
फिटनेस गुरु

कोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात ? जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय

September 22, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.