आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी कढीपत्याचा वापर करतो. कारण यामुळे भाजीला चव येते. पण कढीपत्त्याचा फक्त एवढाच उपयोग नाही तर यांच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कढीपत्त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात.
कढीपत्याचे केसांसाठी काय फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे :
१) कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. सोबतच केस पांढरे होण्यापासून वाचवेल.आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल.
२) कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनीटं तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.
३) वाळलेल्या कढीपत्याच्या पानांचं पावडर तयार करून घ्यावं. आता २०० मिमी खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याचं पावडर मिक्स करा. आणि ते उकळून घ्या. ते तेल थंड झाल्यानंतर गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावं. जर तेल थोडं कोमट करून लावलं तर अधिक फायदेशीर ठरतं. दुसऱ्या दिवशी धुवावेत.