आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात खोकला होणे साहजिक आहे. पण जर हाच खोकला जास्त प्रमाणात वाढला तर समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून खोकला पूर्णपणे बरा होण्यासाठी योग्य उपचार करणे भाग असते. यासाठी औषधोपचारांइतकाच आहारसुद्धा महत्त्वाचा असतो. आज आपण अशाच खोकल्याचा पथ्य- अपथ्या विषयी जाणून घेणार आहोत.
वाताचा खोकला
कोरड्या खोकल्याला वाताचा खोकला असेही म्हणतात. या खोकल्यात कफ पडत नाही, पण छाती,पोट,बरगड्या या ठिकाणी खूप वेदना होतात. अशा या खोकल्यावर विशेष औषध उपयुक्त असते. जाणून घेऊ या औषधाची कृती
यासाठी सर्वप्रथम ओवा, पिंपळी, बेलाचा गर, सुंठ, चित्रक, रास्ना, जिरे, पिठवण, पळस, कापूरकाचरी, पुष्करमूळ हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर हे सर्व मिश्रण ६४ पट पाणी घेऊन ते निम्मे शिल्लक राहीपर्यंत मंद आचेवर उकळावे. आता या पाण्यात तांदूळ शिजवावे. यासाठी तांदळाच्या १४ पट पाणी घेऊन तांदूळ शिजेपर्यंत उष्णता द्यावी. या तयार पेयात तूप, डाळिंबाचा रस आणि सैंधव मीठ मिसळावा. हे मिश्रण खोकल्या झालेल्या व्यक्तीला पिण्यास द्यावे. या मिश्रणाने खोकला, दमा,वारंवार उचकी लागणे, कंबर, छाती, बरगड, कोठा या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होतात.
पित्ताचा खोकला
हा खोकल्याचा दुसरा प्रकार आहे. या खोकल्यामध्ये खोकताना पित्त बाहेर पडते. त्याचबरोबर डोळ्यांसमोर काजवे चमकतात, तर तोंडात कडू चव लागते, वारंवार फार तहान लागते, चक्कर येते. अशा खोकल्यावर उपयुक्त अशा औषधाची कृती जाणून घेऊ
या औषधासाठी काकोली, बृहती, मेदा, महामेदा, अडुळसा, सुंठ एकत्रित करून मिश्रण तयार करावे.
हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घ्यावे.
आता या उकळलेल्या मिश्रणात तांदूळ, मूग वगैरे धान्य शिजवून घ्यावे.
हे मिश्रण पित्त झालेलया व्यक्तीस दिल्यास पित्त कमी होण्यास खूप मदत होते.