आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनियमित जीवनशैलीमुळे दृष्टी कमी होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. चुकीचा आहार, ताणतणाव यामुळे डोळ्यांची निगा राखली जात नाही. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, दृष्टी कमी होण्याची कारणे कोणती आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
दृष्टी कमी होण्याची कारणे
* डोळ्यांना सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. या प्रॉडक्टमधील केमिकल्समुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते.
* पौष्टिक पदार्थांचे आहारातील प्रमाण कमी झाल्यास दृष्टी अंधूक होण्याची शक्यता असते.
* प्रदूषित वातावरणात खूप वेळ राहावे लागत असल्याने डोळ्यांना धूळ आणि धुर यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो.
* रात्री उशीरापर्यंत वाचण करणे, मोबाइलवर गेम खेळणे, टिव्ही बघणे अथवा कॉम्प्यूटरवर जास्त वेळ काम करणे यामुळे डोळे कमजोर होतात.
* गॉगल न लावता कडक़ उन्हात गेल्यास डोळ्यांना नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
वेळो-वेळी पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. यामुळे डोळ्यांचे डिहायड्रेशन होणार नाही. डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी वाढते.
डोळ्यांचा व्यायाम करा
दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते गरम झाल्यावर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
पूर्ण झोप घ्यावी
कमी झोप घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. दृष्टी कमी होते. पूर्ण झोप घेतल्याने दृष्टी चांगली राहते. तसेच डोक़े दुखत नाही.
ब्रेक घ्या
डोळ्यांवर ताण पडणारे काम करत असल्यास थोडासा ब्रेक घ्यावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
तपासणी करा
कुठलाही त्रास नसला तरी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी. या तपसणीमुळे डोळ्यांची योग्य निगा राखता येते. काही निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतो.
दूरच्या वस्तू पाहा
आपण साधारण जवळच्या वस्तु सहज बघतो. परंतु लांबच्या वस्तु बघण्याची सवय करावी. दूरची दृष्टी चांगली राहावी यासाठी अधुन-मधून लांबच्या वस्तू बघाव्यात.
डोळ्यांचा मेकअप
झोपण्याआधी डोळ्यांना केलेला मेकअप काढावा. रात्री झोपताना डोळ्यांना मेकअप ठेवणे धोक्याचे असते. यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता असते.
सनग्लास वापरा
बाहेर जाण्याआधी डोळ्यांवर सनग्लास लावा. यामुळे डोळ्यांचा किरणांपासून बचाव होतो.