आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भोपळा हा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. भोपळ्याचा सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. पण तुम्हाला या भोपळ्याच्या बीचे फायदे माहित आहेत का ?
भोपळ्याच्या बी मध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने त्वचा मोचरईज करण्यास मदत होते . भाजलेले भोपळ्याचे बी किंवा कच्च्या भोपळ्याच्या बीयाचे सेवन केल्याने याचा फायदा होतो. यामुळे जखम ही लवकर भरते. जखम भरण्यासाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते, जे भोपळ्याच्या बी मध्ये जास्त प्रमाणात असते.
भोपळ्याच्या बी मध्ये जिंकचे प्रमाणही असल्यामुळे याचा वापर मुरुमांवर केल्यास मुरूम कमी होण्यास मदत होते. जिंक मुरूम दूर करण्यात महत्त्वाचे काम करते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीही भोपळ्याच्या बीचा वापर चांगला मानला जातो. कारण भोपळ्याच्या बी मध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण असल्याने हे सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.
भोपळ्याच्या बी मध्ये फॅट ऍसिड चे प्रमाण असल्याने हे त्वचेच्या कॅन्सरवर उत्तम उपाय आहे. त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी याला उपयुक्त औषध मानले जाते.
भोपळ्याच्या बी मध्ये आयर्न आणि एल – लायसिनची मात्र मोठ्या प्रमाणात असते. म्हणून याचं सेवनाने केस गळती थांबवते. आणि केसांना पोषण देते.
केसांमध्ये भोपळ्यांच्या बियांचा तेल चांगला मानला जातो. या तेलाने केसांमध्ये मसाज केल्याने तेल चमकदार आणि मुलायम होतात.