आरोग्यनामा ऑनलाईन – संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून एक एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोना व्हॅक्सीन घेण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे आता कुणीही व्यक्ती ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त आहे तो कोरोना लस घेऊ शकतो. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला होता. तर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. सध्या खासगी हॉस्पीटलमध्ये vaccine साठी 250 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे दोन डोससाठी पाचशे रूपये द्यावे लागतील. लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशनची पद्धत जाणून घेवूयात.
व्यायामाच्या वेळी मास्क परिधान केल्यानं कमी होतो ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका, नव्या अभ्यासातील दावा
असे करा रजिस्ट्रेशन…
- सर्वप्रथम आरोग्य सेतु अॅप किंवा को-विन अॅप वेबसाईटवरून लॉगीन करा.
- आरोग्य सेतुवर मोबाईल नंबर टाका, आणि ओटीपी वर क्लिक करा.
- आरोग्य सेतु अॅपमधील को-विन टॅबवर जा आणि लसीकरण टॅबवर क्लिक करा.
- जे पेज उघडेल त्यामध्ये फोटो आयडी, क्रमांकासह पूर्ण नाव नोंदवा.
- फोटो आयडी प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड टाका.
- रजिस्टर बटनावर क्लिक करा.
- नोंदणी केल्यानंतर फोनवर रिप्लाय येईल.
- नोंदणीकृत व्यक्ती एका मोबाईलवर चार लोकांची नोंदणी करू शकते.
- यानंतर, कॅलेंडर आयकॉनवर क्लिक करून तारीख निवडा. लसीकरणासाठी नोंदणी करा.
- लसीकरण केंद्राची एक यादी सुद्धा दिसेल, त्यामधून एक निवडा.
- अखेर एक अपॉयमेंट सक्सेसफुल पेज येईल, ज्यामध्ये सर्व माहिती दिसेल. ती डाऊनलोड करू शकता.
- यासाठी मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करा.
- ओटीपी टाका आणि एडिट आयकॉनवर क्लिक करा.
- आता तुमच्या हिशेबाने तारीख निवडा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
डायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या