आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यातच तरूण पीढी याचा अतिवापर करत असल्याचे दिसते. कामाशिवाय याचा अन्य वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. याचे काही गंभीर दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एआयआयएमएसने केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे.
१. ब्रेन ट्युमरचा धोका
स्मार्टफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन घातक ठरत आहेत. स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने ब्रेन ट्युमरचा धोका वाढतो.
२. धोका १.३३ टक्क्यांनी वाढला
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमरचा धोका १.३३ टक्क्यांनी वाढला आहे.
३. हेडफोन वापरा
रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी हेडफोन, हेडसेट आणि कमी पॉवरचे ब्लूटूथ हेडफोन्स वापरा.
४. मुलांना दूर ठेवा
लहान मुले, तरूण मुले आणि गर्भवती महिलांनी हेडफोन्सशिवाय स्मार्टफोनचा वापर करू नये.