पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा
पोलीसनामा ऑनलाइन टीम : पाऊस कधी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाच्या झळा थोड्या कमी झाल्या असल्या तरी गर्मी अजूनही जाणवत आहे. अशा उकाड्यानंतर पहिला पाऊस पडला तर अनेकजण पावसात भिजण्याचा आनंद घेत नाहीत. कारण, पाहिल्या पावसाच्या पाण्यात असिड असते, असा समज आहे. पण, हा समज चूकीचा असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. पहिल्या पावसात भिजणे हा वेगळाच आनंद असतो.
लखनौ यूनिवर्सिटीतील जिऑलॉजी विभागाचे प्रोफेसर विभूति राय यांनी केलेलेया संशोधनातून पावसाच्या पाण्याबाबतचा हा गैरसमज दूर केला आहे. भूति राय यांनी पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये आरोग्यासाठी घातक असे कोणतेही तत्व नाही. शिवाय हे पाणी पिण्यासाठीही अत्यंत शुद्ध असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. रेन वॉटर केमिस्ट्री इन लखनौवर राय यांनी संशोधन केले. यासाठी त्यांनी शहरातील २६ ठिकाणांवरील पहिल्या पावसाचे पाणी वैज्ञानिक पद्धतींनी एकत्र केले. पाण्याच्या या नुमन्यांच्या तपासणीमध्ये कोणतीच कमतरता आढळली नाही.
पण पावसात भिजताना काही काळजी जरूर घेतली पाहिजे. पावसामध्ये भिजताना केस जास्त भिजू देऊ नका. कारण त्यामुळे आजारी पडू शकता. सर्दी देखील होऊ शकते. हेअर मास्क किंवा पॉलिथिनचाही आधार घेऊ शकता. भिजल्यानंतर लवकर कपडे बदलून व्यवस्थित अंग कोरडे करून कोरडे कपडे परिधान करा. पावसात भिजल्यानंतर घरी आल्यानंतर हळदीचे दूध किंवा आल्याचा चहा अथवा गरम गरम कॉफी प्या. गरमागरम व्हेजिटेबल सूप तयार करून पिऊ शकता. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि शरीराला ऊब मिळते.