आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरजेपेक्षा जास्त वजन कोणत्याही व्यक्तीसाठी चांगले वाटत नाही. वजन कमी करण्यासाठी एक्सपर्ट अनेक प्रकारचे डाएट फॉलो करण्याचा सल्ला देतात. अशाच डाएटमध्ये कुकुम्बर डाएटचा सुद्धा समावेश आहे. परंतु, हे डाएट फॉलो करण्यापूर्वी काही गोष्टी आवश्यक जाणून घ्या.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
काय आहे कुकुम्बर डाएट –
कुकुम्बर डाएट वजन कमी करणारे एक डाएट आहे. हे डाएट फॉलो केल्याने सहजपणे 7 ते 14 दिवसांच्या आत 7 किलोपर्यंत वजन कमी होते, असे म्हटले जाते. या डाएटमध्ये काकडीच्या तुलनेत इतर फळे आणि भाज्यांचे प्रमाण किमान ठेवण्याचा सल्ला दिला जातो. उदाहणार्थ, या डाएटमध्ये प्रामुख्याने काकडीसह काही प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ जसे की अंडे, चिकन, मासे आणि सुकामेवा यांचा समावेश केला जातो.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
कुकुम्बर डाएटसाठी मार्गदर्शक तत्व –
कुकुम्बर डाएट फॉलो करताना तसे कोणतेही खास मानक किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत. हे डाएट फॉलो करणार्या व्यक्तीला आपल्या बहुतांश जेवणात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. या डाएटनुसार, व्यक्तीला जेव्हा भूक लागेल तेव्हा त्याने काकडी खावी. कारण काकडीत कॅलरी कमी असते, तुम्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात काकडी खाऊ शकता. याशिवाय, काकडीत प्रोटीनची मात्रा अतिशय कमी असल्याने, हा डाएट रूटिनमध्ये सहभागी करताना व्यक्तीने काकडीसह प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ जसे की, अंडे, लीन मीट, पनीर, आणि नट्सचा सुद्धा समावेश करावा.
किती आहे परिणामकारक –
कुकुम्बर डाएटमध्ये कॅलरी कमी असल्याने व्यक्तीचे वजन काही काळासाठी कमी होते पण व्यक्तीने आपले जुने डाएट सुरू करताच वजन पुन्हा वाढते.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
कुकुम्बर डाएटचे संभाव्य धोके –
कुकुम्बर डाएटचे सर्वात मोठे नुकसान हे आहे की, काकडीत खुप कमी प्रमाणात पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी पुरेसे नसतात आणि मोठ्या कालावधीपर्यंत अशा प्रकारचा आहार फॉलो केल्याने शरीरात पोषकतत्वांची कमतरता आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय, डाएटमधून जेवण हटवल्यानंतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊन व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा, थकवा आणि औदासिन्य सारखी भावना निर्माण होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच डाएट फॉलो करावा.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
चेहर्यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या
Hair Care Tips : रूटीनमध्ये ‘हे’ 8 बदल करा, आपोआप लांब होतील केस; जाणून घ्या
Skin Care : मासिक पाळी दरम्यान चेहर्यावर फोडं आले तर ‘ही’ गोष्ट करा, जाणून घ्या