‘हा’ त्रास असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नका ‘पपई’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तस पाहिलं तर पपई ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नाही. हे आपल्याला माहित आहेच. तसेच पपई अनेक आजारांवर उपयुक्त असली तरी काही आजार असे आहेत की त्या आजारासाठी पपई खाणे अजिबात चांगले नसते. त्यामुळे जाणून घेऊया ते आजार ज्यासाठी पपई खाणे चांगले नाही.

१) त्वचेच्या समस्या 

काही जणांची त्वचा पिवळी पडते आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तळवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. पपईमधील बीटा कॅरोटीन अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरते. म्हणूनच पपईच्या अतिसेवनामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत. त्यांनी पपई खाऊ नये.

२) रक्तदाब 

ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना पपईचं अतिसेवन धोकादायक ठरू शकते. रक्तदाबाचे औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी पपईचे सेवन करू नये.
blood-pressure
३) किडनी स्टोन 

पपईमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनेक आजारांचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज  होते. व्हिटॅमिन ‘सी’चे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी स्टोन बळावण्याची शक्यतादेखील वाढते. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे. त्यांनी पपईचे सेवन करू नये.


४) गरोदर स्त्रीया 

पपई खाणे हे गरोदर महिलांसाठी अधिक धोकादायक आहे. पपईच्या सेवनामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते. परिणामी गर्भपात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी पपईचे सेवन करू नये.

pregnancy