आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अकाली केसगळतीमुळे अनेकांना कमी वयातच टक्कल पडते. शिवाय टक्कल लपविण्यासाठी कॅप घालणे अथवा विग घालणे असे पर्याय असतात. परंतु, हे पर्याय अनेकांना आवडत नाहीत. अशाप्रकारे अकाली केसगळतीमुळे टक्कल पडले असेल तर त्यावर एक रामबाण औषध आहे. हे औषध घराघरात उपलब्ध असते. त्यास केशर असे म्हटले जाते. अकाली केसगळतीवर केशर म्हणजे संजीवनी बुटी आहे. टकलावर केस येण्यासाठी केशरचा वापर कसा करावा, केसरमध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत, तसेच अन्य आजारांवर केशर कसे प्रभावे ठरते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
केशरची चव कडवट असली तरी सुंगध आणि रंगामुळे त्याचा विविध पदार्थांमध्ये वापर केला जातो. केशरमध्ये कॅरोटीन, लायकोपीन, जियाजाथिन, क्रोसीन, पिपेक्रोसीन हे घटक आढळतात. तसेच ईस्टर किटोन, सुगंधी तेल आणि टेरीपेन अल्डीहाईडसारखे रासायनिक द्रव्यही त्यामध्ये असते. या रासायनिक आणि कार्बोनिक पदार्थांमुळे केशरमध्ये औषधी गुण आहेत. केशर हे उष्ण असल्याने थंड वातावरणात केशरचे सेवन केल्याने इम्युनिटी पॉवर आणि सौंदर्य वाढते.
केसगळतीवर रामबाण उपाय
अकाली केसगळतीचा त्रास असल्यास मुळहठी (मुळथी) दूधात उगाळून त्यात केशर मिसळून डोक्यावर लावावी. काही दिवसांतच टक्कल नाहीसे होते.
अपचन, पोटदुखी, गॅस
जखमेवर केशरचा लेप लावल्याने आराम पडतो. हिवाळ्यात केशरयुक्त दूध प्यायल्याने त्वचा नितळ बनते. केशर, मध आणि बदाम एकत्र खाल्याने पुरूषांची वीर्यशक्ती वाढते. अपचन, पोटदुखी, गॅस या सारख्या समस्यांवर केशर एक रामबाण औषध आहे.
महिलांसाठी लाभदायक
महिलांमधील अनियमित मासिक पाळी तसेच पाळी दरम्यान होणारा त्रास केशर सेवन केल्याने कमी होतो. याचबरोबर गर्भाशयावर आलेली सूजही कमी होते. महिलांमधील उदासिनता कमी करण्यासाठीही केशर उपयोगी आहे. दररोज दुधात केशर टाकून प्यावे.
नवजात बाळासाठी गुणकारी
नवजात शिशुला सर्दी झाल्यास आईच्या दूधात केशर मिसळून ते बाळाच्या डोक्यावर आणि नाकावर लावावे. थोडे केशर दूधही बाळाला पाजावे. गर्भवती महिलेने केशर खाल्याने सुदृढ बालक जन्माला येते.
रक्दाब, सर्दीवर उपाय
कमी रक्तदाबावर केशर एक प्रभावी उपाय आहे. सर्दी झाल्यास एक ग्लास दूधात चिमुटभर केशर आणि एक चमचा मध टाकून प्यायल्यास आराम पडतो.