आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विविध पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. शिवाय टोमॅटोचे सूपही मोठ्याप्रमाणात सेवन केले जाते. टोमॅटो जवेढा चविष्ट आहे तेवढेच त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मही असतात. पुरुषांनी रोज ठराविक प्रमाणात टोमॅटो सेवन केल्याने कॅन्सरचा धोका ५० टक्के कमी होऊ शकतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.
यातील काही तत्व स्किन कॅन्सर सेल्स तयार होऊ देत नाही. तसेच युव्ही किरणांचा प्रभाव कमी होतो. टोमॅटो कॅन्सरचा धोका कसा कमी करते याविषयी जाणून घेवूयात.
संशोधकांनी नर उंदरांवर हा प्रयोग केला. यासाठी त्यांनी नर उंदरांना त्यांच्या आहारात १० टक्के टोमॅटो पावडर ३५ महिने दिली. यात असे दिसून आले की, ज्या उंदरांनी रोज टोमॅटो पावडर खाल्ली त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका टोमॅटो पावडर न सेवन केलेल्या उंदरांच्या तुलनेत ५० टक्के कमी झाला होतो.
स्किन कॅन्सरपासून असा करा बचाव
* टोमॅटोमध्ये लायकोपिन नामक पिगमेंटिंग कम्पाउंड असते.
* हे कम्पाउंड टोमॅटोचा रंग निश्चित करतात.
* लायकोपिन त्वचेचा युव्ही किरणांच्या वाईट प्रभावापासून बचाव करते.
* स्किन कॅन्सरचा धोका टळतो.