आरोग्यनामा ऑनलाईन टीम – न्यूयॉर्कमधील रस्त्यावर पंचिंग बॅग लावण्यात आल्या असून या बॅगला लाथाबुक्क्या मारून नागरिक आपला राग शांत करत आहेत. यामुळे त्यांचा तणाव बाहेर पडत आहे. अ हेल्दी प्लेस फॉर फ्रस्टरेशन असे या बॅगवर लिहिलेले आहे. मनात राग, ताणतणाव असलेल्या व्यक्ती या बॅगेला लाथाबुक्क्यांनी मनसोक्त मारतानाचे दृश्य येथे दिसून येत आहे.
बदललेली जीवनशैली ही ताणतणावपूर्ण आहे. अनेकजण या मानसिक ताणामुळे त्रस्त असतात. यामुळे राग येतो, चिडचिड होते. याचा आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतो. लोकांची ही समस्या जाणून न्यूयॉर्कमधील डोंट टेक दिस राँग वे या डिझाइन स्टुडिओ ने हा आगळावेगळा उपक्रम येथील लोकांसाठी राबवला आहे.
विशेष म्हणजे येथील लोकांनाही हा उपक्रम आवडला असून ते पंचिंग बॅगला लाथाबुक्के मारून फ्रस्टरेशन दूर करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत. ही दृश्य काही लोकांनी फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यामुळे हा उपक्रम अनेकांना आवडला आहे. सोशल मीडिया वरदेखील लोक या उपक्रमाची चर्चा करत आहेत.