आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पाण्याच्या बॉटल्स जवळपास सर्वच घरांमध्ये वापरल्या जातात. या बॉटल्सचा वेगवेगळया कारणांसाठी वापर केला जातो. थंड पाणी मिळावे म्हणून फ्रिजमध्ये त्या ठेवल्या जातात. तसेच मुलांना शाळेत जाताना प्लास्टिकचीच वॉटर बॉटल दिली जाते. शिवाय वेगवेगळे ज्यूस, पेय सुद्धा अशाच बॉटल्समध्ये ठेवली जातात. प्रवासात, ऑफीसला जाताना सुद्धा यांचाच वापर होतो. या बॉटल्सच्या स्वच्छतेचा आणि आरोग्याचा थेट संबंध असल्याने बॉटल्स स्वच्छ ठेवणे खुप गरजेचे असते. अतिशय निमुळते, अरूंद तोंड असल्याने बॉटल्स व्यवस्थित स्वच्छ करता येत नाहीत. या बॉटल्स कशाप्रकारे स्वच्छ कराव्यात याच्या दोन पद्धती आपण जाणून घेणार आहोत.
पहिली पद्धत
प्रथम बॉटल पाण्याने अर्धी भरून घेऊन त्यामध्ये लिंबाचे लहान तुकडे टाकावेत. नंतर २ चमचे मीठ टाका. तसेच आइस क्युब टाका. आता जोराने बॉटल मागेपुढे हालवा. पाच मिनिटे थांबा. नंतर स्वच्छ पाण्याने बॉटल धुवून घ्या. यामुळे बाटली आतून स्वच्छ होते. दुर्गंधी असेल तर तीही दूर होते.
दुसरी पद्धत
बाटलीत थोडे पाणी टाकून त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे व्हिनेगार टाका. आता बाटली चांगली हालवून ५ मिनिटांसाठी तशीच ठेवून द्या. नंतर आतील मिश्रणात ब्रश बुडवून बाटली बाहेरून स्वच्छ करून घ्या. नंतर संपूर्ण बाटली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.