आरोग्यनामा ऑनलाईन टीम- मुलींना मेकअप करायला खूप आवडत. परंतु, कामाच्या गडबडीत त्यांना चांगला मेकअप करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही मुलींना साधारण मेकअप करून लगेच निघावं लागत. पण आम्ही तुम्हाला झटपट आणि आकर्षक मेकअप करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स देत आहोत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कमी वेळात तुम्ही चांगला मेकअप करू शकता.
झटपट मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स खालीलप्रमाणे :
१) मेकअपची सुरुवात फौंडेशनपासून करा. आणि तुमच्या चेहऱ्याला सूट होईल अस फाऊंडेशन लावा. ज्यामुळे तुमचा मेकअप नॅचरल दिसेल.
२) पाऊडर फौंडेशनचा वापर करा जेणेकरून तुम्ही याला कुठेही लवकरात लवकर लावू शकता.
३) डोळ्यांना आयशाडो लावा. हे फक्त दोन मिनिटांचं काम आहे. त्यामुळे मेकअप लवकर होईल.
४) आणि तुम्हाला जर मेकअपची अजिबातच आयडिया नसेल तर तुम्ही डोळ्यांवर प्योर ब्राउन आयशाडो लावा. हे आपल्याला नॅचरल लुक देईल. आणि तुमचा मेकअप ही भडक दिसणार नाही.
५) तुम्ही डोळ्यांना काजळ आणि आयलायनर लावा. त्यामुळे तुम्ही सुंदर दिसाल आणि हे अगदी पटकन होणार काम आहे.
६) त्यानंतर तुम्ही ओठांना तुमच्या आवडीचा लिपबाम लावा. लिपबाममुळे तुमचा मेकअप अजून सुंदर दिसेल. अशा पद्धतीने या सोप्या टिप्स वापरून जर तुम्ही मेकअप केला तर मेकअप पटकन होईल आणि तुम्ही सुंदरही दिसाल.