आरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकघरात वापरली जाणारी मोहरी(Mustard ) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारांवर तर आरोग्यदायी आहेच, सोबतच केसांच्या वाढीसाठीही मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. आज आपण मोहरीच्या(Mustard ) तेलाच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
1) त्वचा उजळण्यसाठी – मोहरीच्या बियांचा वापर आपल्याला नैसर्गिक स्क्रब म्हणूनही करता येतो. मोहरीच्या बियात गुलाबजलाचे 3-4 थेंब टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. यामुळं चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. मोहरीचं तेलं खोबरेल तेलात मिसळून चेहऱ्याला लावावं. यामुळं रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा उजळते.
2) केसांच्या आरोग्यासाठी – केस रूक्ष होणं, खाज, कोंडा अशा केसांच्या समस्यांवर मोहरीचं तेल गुणकारी आहे. आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल कोमट करून त्यानं केसांची मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासानं केस शॅम्पूनं धुवून घ्या. यामुळं केसांच्या समस्या दूर होतील आणि केस चमकदार होतील.
3) सर्दी – कोणत्याही सर्दीला अनेक उपचार करूनही फरक पडत नसेल तर मोहरीची चिमूटभर पूड ही मधासोबत खावी.
4) कफ- छातीत जर कफ झाला असेल तर मोहरी आणि मीठ यांचा काढा प्यावा. काढा प्यायल्यानंतर उलटी होते आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते. परंतु केवळ तरुणांनीच हा प्रयोग करावा.
5) पोटफुगी, अपचन, अजीर्ण यासाठी मोहरी चूर्ण आल्याच्या रसा सोबत घ्यावं. मोहरी उष्ण आहे. याचं भानही काय ठेवावं.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.