आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात दगदग केल्यानंतर प्रचंड जाणवतां. अनेकदा या थकव्यातून अन्य समस्याही कधीकधी उद्भवतात. अंगदुखीचाही त्रास होतो. उत्साह कमी होऊन त्याचा परिणाम कामावर होतो. यासाठी मसाज केल्यास फायदा होतो. मसाज केल्यानं शरीर ताजंतवानं होतं. आराम मिळाल्यानं शांत आणि फ्रेश वाटतं.
हेड मसाज, गालांना मालिश, बॅक मसाज, नेक मसाज, लेग मसाज, असे मसाजचे प्रकार आहेत. मसाज केल्याने स्नायूंच्या वेदना दूर होतात. याव्यतिरिक्त मेटाबॉलिज्मची प्रक्रियाही सुरळीत होते. त्यामुळे शरीराला आराम देण्यासोबतच समस्यांपासून दूर राहण्यासाठी मसाज करणं फायदेशीर ठरतं. मसाज केल्याने शरीरामध्ये ब्लड सक्र्युलेशन सुरळीत होतं. त्यामुळे ब्लड प्रेशरची समस्येपासून दूर राहणं शक्य होतं. मसाज केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच डोळ्यांची दृष्टी वाढण्यासाठीही मदत होते. तसेच त्वचा चमकदार आणि तजेलदार होते.
मसाज केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते. तसेच मसाज केल्याने शरीर सुदृढ होतं. दररोज मसाज केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. मसाज केल्याने त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते आणि त्वचा चमकदार होते. मसाज केल्याने डोकं शांत राहतं आणि मानसिक आरोग्य जपण्यासही मदत होते. मसाज करताना जे तेल वापरण्यात येतं. ते स्किन पोर्समध्ये जातं त्यामुळे जीवाणू शरीरामध्ये जाण्याचा धोका टळतो