आरोग्यनामा ऑनलाईन- झेंडूची फुले सामान्यत पूजा आणि सजावट करण्यासाठी वापरली जातात; पण आपल्याला माहिती आहे का एक चांगला सुगंध देण्याबरोबरच त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात झेंडू फायदेशीर ठरते. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे त्वचा सुधारण्यास तसेच मुरुम, सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करतात. झेंडूच्या फुलांनी बनवलेल्या घरगुती पॅकने आपल्या सौंदर्यात भर पडेल.
१) तेलकट त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट
१ चमचा झेंडूची पेस्ट घ्या, त्यात १ चमचा मध घाला, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा गुलाब पाणी घालून चांगले मिश्रण तयार करावे आणि आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. फेस पॅक कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा वापरल्याने तेलकट त्वचा दूर होते.
२) टॅनिंग दूर करते
यासाठी १ चमचा झेंडूची पेस्ट, थोडी हळद, अर्धा चमचा दुधाची क्रीम आणि अर्धा चमचा मध मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. नियमितपणे फेसपॅक वापरल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते.
३) म्हस दूर करते
झेंडूची फुले त्वचेचा म्हस सहज काढण्यात मदत करतात. यासाठी झेंडूच्या फुलांच्या काही पाकळ्या बारीक करून मऊ मिश्रण तयार करा. ते सतत १५ दिवस म्हसवर लावा. असे केल्याने लवकरच म्हस पासून आराम मिळेल.
४) चमकणार्या त्वचेसाठी फायदेशीर
ते तयार करण्यासाठी बदामाच्या तेलात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या घालून सुमारे १५ दिवस असेच ठेवा त्यानंतर कापड्याच्या मदतीने मिश्रण गाळून घ्या. आता हे मिश्रण झोपायच्या आधी दररोज आपल्या चेहऱ्यावर लावा. सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा पाण्याने धुवा. हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.