आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एका पूर्ण संतुष्टी देणाऱ्या काम क्रिडेत कधी लव्ह बाइट होतात हे समजत नाही. ही क्रिडा झाल्यानंतर आरशात पाहिले असता मान किंवा चेहऱ्यावर लव्ह मार्क्स दिसतात. काम क्रिडा करताना लव्ह बाईट्स त्वचेवर एखाद्या जागेवर इंटेस सकिंग केल्याने होतात. परंतु, ही शारीरिक संबंधाच्या आवेशात होणारी एक सामान्य बाब आहे. लव्ह बाइटचे निशाण काही लोकांच्या शरीरावर कायम राहू शकतात. कालांतराने ही खूण हलकी होते. त्वचेच्या फार आत इजा झाली तर असे होऊ शकते. हे तुम्हाल नको असल्यास पार्टनरशी याबाबत बोलले पाहिजे.
त्वचेवर जराही दबाव पडला तर त्वचा लगेच निळी किंवा काळी पडत असेल तर शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा हा संकेत आहे. ज्यांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते त्यांच्या शरीरावर लव्ह बाईट लगेच उमटतात. यासाठी आहारावर लक्ष दिले पाहिजे. शारीरिक संबंधावेळी योग्य ती काळजी घेतली नाही. तर लव्ह बाइटमुळे गंभीर लैंगिक आजार होऊ शकतो. यामुळे जोडीदाराच्या मनात भीतीही बसू शकते. शारीरिक संबंधावेळी सौम्य, पार्टनरची उत्तेजना वाढेल असा चावा घेणे सामान्य बाब आहे. पण हिंसक होऊन चावा घेणे चांगले लक्षण नाही.
दोघांपैकी एकाला जर शरीरावर कुठे गजकरण किंवा त्वचेसंबंधी इतर समस्या असेल आणि दुसरा पार्टनर त्याच जागेवर चुकून चावा घेत असेल, तर या स्थितीत ओरल हर्पीज म्हणजे तोडांच्या त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतो. लव्ह बाईटबाबत कल्पना करत असाल तर ही सेक्शुअल नाही तर सायकॉलॉजीकल समस्या असू शकते. याचा अर्थ लव्ह लाइफमध्ये काही सुधारणेची गरज आहे. अथवा मनात काहीतरी ओढाताण सुरू असून शकते. जास्तीत जास्त सस्तन प्राणी हे शारीरिक संबंधावेळी पार्टनरच्या मानेवर किस करतात. याने उत्तेजना वाढते, असे लैंगिक समस्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक हॅवलॉक इल्स यांनी एका संशोधनात सांगितले आहे.